मुलांपासून दूर जाताना... संकर्षण कऱ्हाडेने शेअर केली भावनिक पोस्ट; पालकांनो आठवणींमुळं होणारी मनाची घालमेल कशी थांबवाल?
कवी मनाचा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. ज्यामध्ये तो म्हणतो की, आता मुलांना सोडून जातांना... मी तस्साच रडतो. मुलांपासून दूर होताना पालकांच्या मनाची घालमेल त्याने या कवितेत व्यक्त केलीय.
आपल्या अभिनयासोबतच आपल्या कवितांनी प्रेक्षकांच मन जिंकणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे. संकर्षणच्या कविता कायमच अनेकांच्या डोळ्यात पाणी आणतात. अशीच एक कविता नुकतीच त्याने पोस्ट केली आहे. ज्यामध्ये संकर्षणने बाप-मुलांचं नातं अधोरेखित केलं आहे. त्यासोबतच आपलं-वडिलांचं नातं आणि आपलं-मुलांचं नातं छान शब्दांमध्ये शब्दबद्ध केलंय. संकर्षण आपल्या "नियम व अटी लागू' या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे. यावेळी त्याने आपल्या परदेश दौऱ्यांचे शेड्युल शेअर केले आहे. यासोबतच ती कविता पोस्ट केली आहे.
काय आहे त्या कवितेत
अनेक पालक खास करुन मुलांचा बाबा हा कामानिमित्त मुलांपासून लांब असतो. अनेक वडिलांच्या कामानिमित्त फिरतीच्या नोकऱ्या असतात. यामुळेच आपल्या मुलांपासून ते लांब असतात. अशावेळी आपल्या मनात एक नकारात्मक आणि अपराधीपणाची भावना येऊ शकते. यावर पालकांनी काय उपाय करावा? हे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
तुमच्या भावना मान्य करा
अनेकदा पालक खासकरुन वडिल आपल्याला मुलांपासून लांब जाताना त्रास होतो, ही भावनाच मान्य करत नाहीत. तुमच्या भावना तुमच्या मुलांसोबत शेअर करा. जसे की, मुलांपासून दूर जाताना वाईट वाटणे, डोळ्यातून पाणी येणे ही अतिशय सामान्य बाब आहे. पण ती व्यक्त करायला हवी.
इतर पालकांशी बोला
इतर पालकांशी बोलल्याने तुम्हाला कमी अपराधी वाटू शकते. कारण पालक म्हणून या ना त्या फरकाने प्रत्येक पालक सारख्या समस्यांना सामोरे जात असतात. अशावेळी तुम्ही लोकांशी बोलल्यावर तुम्हाला ते या परिस्थितीवर कसे मात करतात? हे समजून त्यापद्धतीने तुमच्या वागण्यात बदल करू शकता.
सपोर्ट सिस्टम तयार करा
आपल्या आजूबाजूला एक सपोर्ट सिस्टम तयार करा. जसे की, तुम्ही कुटुंब, मित्र, ग्रुप थेरपी किंवा शोक समुपदेशकावर अवलंबून राहू शकता. तुमच्या भावनांचा आदर करा: तुमच्या भावनांकडे लक्ष दिल्याने तुम्हाला त्या उद्देशानुसार वापरण्यात मदत होऊ शकते.
भावनांचा आदर करा
पालकांनी आपल्या भावनांचा आदर करावा. भावनांना मोकळी वाट करून द्यावी. काही पालक शब्दात आपल्या भावना व्यक्त करतात तर काही पालकांनी त्या लिहून ठेवाव्यात. तर काही पालक चित्राद्वारे व्यक्त होऊ शकतात. या सगळ्यात तुमचं व्यक्त होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या मनात येणाऱ्या विचारांना मोकळं व्हायला देणं एक पालक म्हणून गरजेचे आहे.